Skip to main content Screen Reader Access A A A A Text Size : A-AA+ English मराठी

NEWS & EVENTS

Training Programme - 2

New Page 1

नवनियुक्त परिविक्षाधीन गट बराजपत्रित अधिकारी यांचे विधीमंडळच्या कामकाजाबाबतचे प्रशिक्षण कार्यक्रम

दि. ५ ते ७ ऑगस्ट, २०१५

     महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले नवनियुक्त परिविक्षाधीन गट ब’   राजपत्रित अधिकारी यांचे विधीमंडळच्या कामकाजाबाबतचे प्रशिक्षण  वनामती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय व वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने एकत्रित पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमदिनांक ५ ते ७ ऑगस्ट, २०१५ या कालावधीत विधानसभा सभागृह  विधानभवन नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते.  सदर प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता एकंदरीत १७९ अधिकारी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. खास या प्रशिक्षण कार्यक्रमास मार्गदर्शन करण्याकरिता मुंबईहून महाराष्ट्र विधीमंडळाचे प्रधान सचिव , मा. डॉ.  अनंत कळसे, सचिव श्री. यु. के. चव्हाण व त्यांची सहकारी उपस्थित होते.

     दिनांक ५ ऑगस्ट २०१५ रोजी  मा. डॉ.  अनंत कळसे यांचे अध्यक्षतेखाली व  वनामतीचे महासंचालक मा. एन. नवीन सोना (भा. प्र. से.) यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे सुरवातिला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. हरिभाऊजी बागडे, यांनी दिलेल्या विशेष संदेशाचे वाचन करण्यात आले. त्यात त्यांनी सांगितले कि, शासनाच्या तिजोरीतील सर्वाधिक खर्चाचा भार  प्रशासनावरील आस्थापनेवर आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून जनतेच्या आणि सरकारच्या अपेक्षा पूर्ण होणे आवश्यक आहे. जनतेप्रती उत्तरदायित्वाची हि जाणीव अशाप्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे अधिक प्रगल्भ व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी संदेशाद्वारे व्यक्त केली.त्याचप्रमाणे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे  सभापती, मा. रामराजे नाईक निंबाळकर यांनीही पाठविलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले, त्यामध्ये संवेदनशील शासन आणि गतिमान प्रशासनहे ब्रीद सार्थ ठरविण्यासाठी  अशाप्रकारचे प्रशिक्षण वर्ग तत्पर आणि कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी तयार करण्याकामी उपयुक्त ठरत आहेत, असे त्यांनी विशेषकरून  नमूद केले.

     याप्रसंगी वनामतीचे महासंचालक मा. एन. नवीन सोना (भा. प्र. से.)  यांनी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांचे प्रास्ताविक भाषणात एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षणाविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच या प्रशिक्षणाकरिता आमचे विनंतीस मान देऊन नागपूर येथील विधानसभा सभागृह  उपलब्ध करून दिले गेले, हि एक बहुमानाची बाब आहे. याबद्दल त्यांनी मा. अध्यक्ष विधानसभा, सभापती विधानपरिषद व प्रधान सचिव विधानमंडळ यांचे विशेष आभार मानले.

    या कार्यक्रमात मा. प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी संविधान व महाराष्ट्र विधिमंडळ कामकाजाविषयी अधिकारी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.   डॉ. कळसे म्हणाले, भारतीय लोकशाही ही कल्याणकारी राज्याची असून अमेरिकन, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांच्या संविधानाचा विचार करता , भारतीय लोकशाहीत नागरिक सर्वोच्च आहेत. भारतीय लोकशाही शासन प्रणालीत कायदे तयार करणे, त्यावर धोरणे ठरविणे ही महत्वाची कामे केली जातात. तयार केलेल्या कायद्यांचा अर्थ लावणे हे न्याय व्यवस्थेचे काम असून प्रसारमाध्यमेही तितक्याच प्रभावीपणे कार्य करत आहेत.

     भारतात कायद्याप्रमाणे काम करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काम करताना शासनाची गुड गव्हर्नंसहि संकल्पना राबविणे महत्त्वाचे आहे. विधिमंडळात लोककल्याणाच्या दृष्टीने कामे केले जाते  त्यामुळे हि प्रणाली प्राणपणाने जपण्याचा आपण सर्वाने  प्रयत्न  करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

     उद्घाटन कार्यक्रमास  विधानमंडळ सचिवालय मुंबईचे  सचिव मा. श्री. उत्तमसिंह चव्हाण ,सहसचिव मा. श्री. एम. एम. काज.मा. श्री. उपसचिव सुभाषचंद्र मयेकर, उपसचिव मा. श्री. एन. आर. थिटे, उपसचिव (विधी) मा. श्री.  एन. जी काले,उपसचिव मा. श्री.  विलास आठवले , जनसंपर्क अधिकारी मा. श्री. निलेश मदाने उपस्थित होते. तसेच वनामतीचे अतिरिक्त संचालक श्री. राजरतन कुंभारे, जनसंपर्क अधिकारी श्री. पी. एन. राऊत वरिष्ठ प्रशासन अधिकारी   श्रीमती सुवर्णा पांडे , उपसंचालक श्री. विलास कोलते, प्रा. एल. जी. वार्डेकर, प्रशिक्षण समन्वयक श्री. मिलींद तारे व  श्रीमती सीमा मुंडले, संगणक प्रोग्रामर श्रीमती उर्मिला शेंडे व वनामती संस्थेचे अधिकारी/ कर्मचारी  प्रामुख्याने उपस्थित होते.

    त्याचप्रमाणे मा. उपसचिव श्री. सुभाष मयेकर, यांनी भारतीय लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

     प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी ( दिनांक ६ ऑगस्ट २०१५ रोजी)  सहसचिव  मा. एम. ए. काज, यांनी कायदा तयार करण्याचा कच्च्यामसुद्यापासून त्याचे धोरण ठरविणे आणि त्यानंतर दोन्ही सभागृहासमोर मांडणे याबाबतची प्रक्रिया मुद्देसूद समजावून सांगितली. त्यानंतर  मा. सचिव श्री. उत्तमसिंग चव्हाण यांनी विधिमंडळाची रचना , कार्यपद्धती व संसदीय आयुधे यावर परिविक्षाधीन अधिकार्यांना मार्गदर्शन करताना  १९३५ चा कायदा हा भारतीय लोकशाहीतील मैलाचा दगड असल्याचे नमूद केले. यावेळी श्री. चव्हाण यांनी नवीन शासन गठीत होत असताना सदस्यांचा शपथविधी, कामकाज, त्यात सहभागी सदस्य, अधिवेशनाची कार्यपद्धती याबद्दलची माहिती दिली. मा. उपसचिव (विधी) श्री. एन. जी. काले यांनी सभागृह सदस्यांचे विशेषाधिकार या विषयावर माहिती दिली.

    प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी ( दिनांक ७ ऑगस्ट २०१५ रोजी)  सुरवातीस मा. उपसचिव श्री. विलास आठवले यांनी विधीमंडळ कामकाजाचे न्यायालायाबरोबर परस्पर संबंध कसे असतात यावर सविस्तर मार्गदर्शन केले व त्यानंतर मा. उपसचिव श्री. एन. आर. थिटे यांनी विधिमंडळ समिती पद्धती कशी असते हे विविध उदाहरणासह प्रशिक्षणार्थ्याना समजावून सांगितले. तदनंतर विधीमंडळाचे कामकाज, प्रशासन व विविध प्रसिद्धी माध्यमांबरोबरचे परस्पर संबध या विषयावरमा. जनसंपर्क अधिकारी श्री. निलेश मदाने यांनी प्रशिक्षणार्थ्यानामार्गदर्शन केले.

     कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी वनामतीचे मा. महासंचालक एन. नवीन सोना यांनी सर्व परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधितकेले. तसेच त्यांच्या पुढील टप्प्यातील तांत्रिक प्रशिक्षण  कार्यक्रमाकरिता शुभेच्छा दिल्या व सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

  Click here for photos...


Welcome to"VANAMATI"